आपला जिल्हा

प्रतिबंधित गूटखा तंबाखुजन्य पदार्थाची चोरटी विक्री प्रकरणी 59,960/- रूपयेचा मुददेमाल जप्त

सेलू पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल

सेलू ( प्रतिनिधी ) दि.19 एप्रिल रोजी सेलू शहरातील अजंटा कालनी येथे शेख राजु शेख इब्राहीम यावर प्रतिबंधीत गूटखा तंबाखुजन्य पदार्थाची चोरटी विक्री प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांनी कार्यवाही करत तब्बल 59,960/- रूपयेचा मुददेमाल जप्त करून विष्णु असाराम चव्हाण वय स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांच्या फिर्यादी वरून व पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या आदेशानुसार आरोपी वर सेलू पोलीस ठाण्यात गुरनं 207/2026 कलम 123,274,275,223 भारतीय न्याय संहीता-2023 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की आरोपीने त्याचे राहते घरी व किराणा दुकाणात स्वताच्या आर्थिक फायदयासाठी प्रतिबंधीत गूटखा पानमसाला व तत्सम तंबाखुजन्य पदार्थाची चोरटी विक्री करण्याच्या उददेशाने ताब्यात बाळगला, तसेच पोलीसांना पाहुन पळुन गेला म्हणुन उपरोक्त गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी कडून रुपये 45540/- किमतीचा ज्यात केसरयुक्त विमल पान मसाला गुलाबी रंगाचे 230 पुडे प्रति पुडा कि. 198 रु प्रमाणे.
रुपये 5060/- किमतीचा ज्यात पांढ-या रंगाच्या थैलीमध्ये V-1 तंबाखुचे निळयालाल रंगाचे 230 पुडे प्रति पुडा कि.22 रु प्रमाणे.
रुपये 5616/- किमतीचा ज्यात पांढ-या रंगाच्या थैलीमध्ये प्रिमीयम राजनिवास सुघंधीत पान मसाला हिरव्या रंगाचे 39 पुडे प्रति पुडा कि. 144 रु प्रमाणे.
रुपये 3744/- किमतीचा ज्यात पांढ-या रंगाच्या थैलीमध्ये प्रिमीयम के. एम. 01 जाफरानी जर्दा चे 39 पुडे प्रति पुडा कि.96 रु प्रमाणे. असा एकूण- 59,960/- रूपयेचा मुददेमाल जप्त केला. घटनेचा पुढील तपास पोउपनि शेख करत आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!