आपला जिल्हा
मोकाट कुत्र्याने मॉर्निंग वॉक करत असताना चावा घेतला
सेलू नगर परिषदेला मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अपयश..

सेलू (प्रतिनिधी) सेलू शहरात दि. 16 एप्रिल रोजी सकाळी मॉर्निंग वॉक साठी चालत असताना सेवानिवृत्त कर्मचारी शमशोदिन शेख यांच्या डाव्या हाताला मोकाट कुत्र्याने कडाडून चावा घेतल्याची घटना शहरातील भोई गल्ली परिसरात घडली.
विशेष म्हणजे हे कुत्रे गाडे वर बसतात आणि अचानक मांणसाच्या अंगावर झेप घेऊन चावा घेत आहेत या घटनेत शेख यांच्या डाव्या हाता ला गंभीर दुखापत झाली असून त्यांना सेलू उप जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारा साठी दाखल करावे लागले आहे,शहरातील भोई गल्ली,सुरज मोहेल्ला(म्हसोबा चोक) जव्हेरी गल्ली व अन्य ठिकाणी देखील मोकाट कुत्र्यानी लहान बालकां सह जेष्ठ नागरिकांना चावा घेतल्याचे घटना घडल्या आहेत,परंतु नगर परिषद प्रशासनाने मात्र कुंभकर्णी झोपेत असून मुख्य अधिकारी, नगर अध्यक्ष या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणार का असा सवाल शहरातील नागरिक विचारत आहे, सेवा निवृत्त शमशोदिन शेख हज यात्रेसाठी जाण्यासाठी काही दिवस राहिल्याने तयारी करीत असताना हे घटना घडली.
रोज सकाळी नहेमी प्रमाणे गुरूवारी सकाळी ते भोई गल्ली मधून परत घरी जात असताना मोकाट कुत्र्याने त्यांचे डाव्या हाताला चावा घेतला या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर जखम झाली आहे कुत्र्याने अक्षरशा त्यांच्या डाव्या हाताला पुर्ण तोंडा मध्य घेण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही, नाही तर लचका तोडला असता त्या मुळे डाव्या हातावर खोलवर जखम झाल्याचे स्पष्ट दिसुन येत आहे या घटने नंतर शेख यांना तात्काळ सेलू उप जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
सेलू नगर परिषदेला मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अपयश आले आहे, सेलू शहरात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात नगर परिषद स्पेशल कुचकामी ठरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे मोकाट तसेच पिसाळलेल्या कुत्र्यां मुळे अन्य रोगराई पसरण्याची भिंती व्यक्त केली जात आहे त्या मुळे संपूर्ण शहरातील मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त नगर परिषदेने तात्काळ करावा अशी मागणी नागरिकां मधुन जोर धरताना दिसून येत आहे.



