सेलू ( प्रतिनिधी ) सेलू शहरातील एका शाळेत शिकणाऱ्या मुलीचा शाळेत येता जाता सतत पाठलाग करून त्रास देणाऱ्या युवकाच्या जाचाला कंटाळून एका 16 वर्षीय शालेय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना दिं. 17 एप्रिल रोजी 01.30 ते 01.45 देउळगावगात ता सेलू जि परभणी येथे घडली.
या बाबत सेलू पोलीस ठाण्यात फिर्यादी वय 42 वर्ष ह.मु. पाथरी रोड तहसील कार्नर सेलू यांनी आरोपी कैलास विजय लोंडे रा. अर्जुन नगर, सेलू . जि. परभणी व एका अनोळखी इसमावर सेलू पोलीस ठाण्यात गुरनं 204/2026 कलम 108,352,351(2)(3),3(5), 78 BNS 2023, 12 पोक्सो
अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबत मिळालेल्या माहिती नुसार पीडित मुलीस मागील तिन महिन्यापासुन शाळा सुटण्याच्या वेळेस जाता येता त्रास देत असल्याने फिंयादचे मुलीस मानसीक त्रास दिला माझ्या मुलाला शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्या भिती मुळे व नेहमीच्या त्रासाला कंटाळु घरी गफळास घेवुन आत्महत्या केली आहे.
सेलू पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करुन पुढील तपासकामी श्रीमती पुंगळे यांचेकडे दिला आहे.
या प्रकरणी माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी वाघमारे साहेब सेलू पोलीस निरीक्षक बोरसे साहेब, मसपोनि पुंगळे मॅडम यांनी घटना स्थळी भेट दिली.