आपला जिल्हा
गटकळ अकॅडमी सेलू ची कु.स्वाती बाबासाहेब खंदारे यांची परभणी पोलीस पदी निवड

सेलू (प्रतिनिधी ) नुकत्याच लागलेल्या निकालांमध्ये गटकळ करिअर अकॅडमी ची विद्यार्थिनी कु.स्वाती बाबासाहेब खंदारे (रा. हातनूर तालुका सेलू जिल्हा परभणी) यांची परभणी पोलीस पदी(परभणी जिल्हा महीलांमधून प्रथम) निवड झाली. याबद्दल तिचा आईवडिलांसह अकॅडमी तर्फे व गवकर्यांतर्फे वाजत गाजत मिरणुक काढून, जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करत सत्कार करण्यात आला. या वेळी तिच्या सोबतच अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेऊन पालघर पोलीस पदी निवड झालेली ममता थोरात,मुंबई लोहमार्ग पोलीस पदी निवड झालेली मोनाली जमधाडे आणि सुरेखा चव्हाण यांचाही सत्कार करण्यात आला.अतिशय प्रतिकूल परिस्थितीत चारही मैत्रिणीने एकाच वेळी हे यश संपादन केल्यामुळे सेलू तालुक्यातील सर्व स्तरातून तिचे व गटकळ अकॅडमीचे कौतुक होत आहे.




