आपला जिल्हा

महाभारत भारतीय संस्कृतीचा ज्ञानकोश आहे  – स्वामी गोविंददेव गिरीजी

महाभारत संदेश कथेस भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सेलू ( प्रतिनिधी ) चार पुरुषार्थ, चार आश्रम, चार वर्ण, चार साधना याचे सर्व ज्ञान असलेला एकमेव महाभारत हा ग्रंथ आहे. नित्य महाभारत श्रवणाने बुध्दी तिक्ष्ण होते. यशस्वी होण्याचा मुलमंत्र महाभारत कथा देते. असे प्रतिपादन स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले. शहरातील सातोना रस्त्यावरील मयुरी पार्क परिसरातील अलंकापुरी नगरीत गुरूवार ( दि.१२ ) रोजी फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यात स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून ‘ महाभारत संदेश कथा ‘ प्रारंभ झाली.

पुढे बोलताना स्वामी गोविंददेव गिरीजी म्हणाले की, ” महाभारत भारतीय संस्कृतीचा ज्ञानकोश आहे. आपल्या समृद्ध संत परंपरेने दिलेला जय जय रामकृष्ण हरी हा केवळ जप करण्याचा मंत्र नाही. तर आपल्या जीवनाचा अभ्यासक्रम आहे. माणसाने वयाच्या २० व्या वर्षांपर्यंत रामकथेतून निती शिकावी. तारूण्यात कसं जिंकाव ही युक्ती महाभारतातून शिकावी. उतारवयात भागवतामधून मुक्ती शिकावी. माणसाने जीवनात कधीही हार मानू नये. झालेल्या चुका दुरुस्त करून जीवनाची वाटचाल करावी. केवळ महिला दिनीच नाही तर महिलांना रोज सन्मानाने वागवले पाहिजे.जी माणसे विवेक जागृत ठेवून जगतात. ज्यांनी क्रोध सोडून दिला. त्याला जीवनात पच्छात्ताप करण्याची वेळ येत नाही. हा संदेश महाभारत कथा देते.” असेही स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज म्हणाले. प्रास्ताविक ह.भ.प. पंडित महाराज डाके यांनी केले. सुत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन प्रा. संजय पिंपळगावकर यांनी केले.

सावित्रीबाई बिहाणी, जयप्रकाश बिहाणी, किरण बिहाणी, राम नाना पाटील, माधुरी पाटील, नारायण मुसळे, गजानन आघाव, डॉ.आशिष डख, अशोक पटवारी, कचरू शेरे, ओमप्रकाश मेहता, पारस काला यांची विशेष उपस्थिती होती.

भावीकांसाठी चिकलठाणा (खु.),कौसडी,हातनुर, घोडके पिंपरी,राणी वाहेगाव, प्रिंपुरा,कंरंजी, करजखेडा ( पु.) या गावातील गावकऱ्यांनी सेवा दिली. सकाळ सत्रात पारायणास आणि दुपार सत्रात महाभारत संदेश कथेस पंधरा हजारांहून अधिक भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!