सेलू ( प्रतिनिधी ) शहराच्या मध्यवस्तीमध्ये असलेल्या श्री नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर येथे २४फेब्रुवारी २०२६ते ४ मार्च २०२६ दरम्यान शाश्वत अश्टानिका महापर्वाच्या निमित्याने श्री सिद्धीचक्र महामंडळ विधानाचे आयोजन करण्यात आले होते. याचे पूजन इंदोर येथील विद्यानाचार्य बाल ब्रह्मचारी श्री तरुण भैय्याजी यांच्या पावन सानिध्यात अत्यंत भक्तीमय वातावरणात पूजन आणि इतर धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
शहरातील सर्व जैन समाज बांधवांनी आदरणीय तरुण भैय्याजी यांच्या अमृतमय वाणीचा लाभ घेतला सुमारे आठवडाभर चाललेल्या या मंगल महोत्सव तरुण भैय्याजींच्या मधुर वाणीने भाविकांना मंत्रमुग्ध केले. केवळ पूजन नाही तर पूजेतील प्रत्येक अर्ध्याचा सखोल अर्थही तरुण भैय्याजी यांनी समजावून सांगून पूजेतच स्वाध्याय पण घेतला सर्व जैन समाज बांधवांच्या अथक प्रयत्नामुळे तसेच प्रत्येकाने दिलेल्या योगदानामुळे हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. या धार्मिक अनुष्ठान मध्ये विशेष करून पूजन, प्रवचन आणि हवन इत्यादी विविध प्रकारच्या विधी संपन्न झाल्या या धार्मिक अनुष्ठानचा जैन समाज बांधवांनी धर्म लाभ घेतला आहे.