महाराष्ट्र

अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात

बारामती – आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे. विमान लँडिंग करत असताना ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार विमानात अजित पवारांसह एकूण 6 जण प्रवास करत होते, त्यापैकी 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत असताना अजित पवार यांचे छोटे विमान बारामतीच्या धावपट्टीवर लँडिंगच्या वेळी अपघातग्रस्त झाले. प्राथमिक माहितीनुसार, विमान उतरत असताना हा अपघात झाला. आज अजित पवार यांचे बारामतीत एकूण 4 ठिकाणी नियोजित कार्यक्रम होते. या कार्यक्रमांसाठीच ते मुंबईहून बारामतीत दाखल होत होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!