आपला जिल्हा

“मुठभर माती” मराठवाडाचा पट मांडणारं आत्मचरित्र – डॉ शरद कुलकर्णी

सेलू ( प्रतिनिधी ) शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत जनार्दन वाघमारे यांचे मुठभर माती हे आत्मचरित्र प्रत्येकाला प्रेरणा देणारे, दिशादर्शक असे आत्मचरित्र असून सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्ती देखील शिक्षण आणि गुणवत्तेच्या माध्यमातून गरूडझेप घेऊ शकते हे दाखवून देते असे प्रतिपादन एक दिवस एक पुस्तक या स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय सेलूच्या ३९ व्या पुष्पात बोलताना प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी यांनी केले.पुढे बोलताना ते म्हणाले की मुठभर माती हे आत्मचरित्र एकंदरीत मराठवाड्याचा पट मांडणारे असून त्यातून शैक्षणिक, सामाजिक व राजकीय मराठवाडा आपल्यापुढे उभा रहातो.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रो डॉ उत्तम राठोड हे होते.यावेळी स्व.अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रातील सन्मानित केलेल्या दिलीप डासाळकर, प्रा.अनिल कुलकर्णी,रवि मुळावेकर, डॉ.दिगंबर घोडके,माधव गव्हाणे, गणेश माळवे यांचा ग्रंथालयाच्या वतीने महेश खारकर, चंद्रशेखर मुळावेकर,हेमंतराव आडळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा प्रभाकर रावते यांनी केले तर सुत्रसंचलन आम्रपाली खाजेकर यांनी केले.आभार प्रदर्शन कथाकार डॉ. रमेश बोराडे यांनी केले.
यावेळी डॉ.वसंत पांचाळ,अशोक उफाडे, पांडुरंग पाटणकर,हरिहर खिरे,शांतीकुमार धर्माधिकारी, देऊळगावकर गजानन, विठ्ठल कटारे, शिवाजी दळवे, रवींद्र पाठक, डॉ.शाम आवटे, आर.एम.खाडप, सुभाष मोहकरे, आण्णासाहेब बोराडे, विनायक धामणगावकर, यशवंत चारठाणकर, दत्तात्रय माकोडे, खंडागळे डि.जी.यांची उपस्थिती होती.

अभिमानाची बाब

जनार्दन वाघमारे लातूर नगरपरिषदेत निवडून आले.तेव्हा माझ्यापुढे सेलूतील स्व.श्रीरामजी भांगडिया आणि प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांचा आदर्श होता असे आत्मचरित्रात नोंदवले आहे ही आपल्या सेलूकरांसाठी अभिमानाची बाब आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!