सेलू ( प्रतिनिधी ) हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गास जोडणारा जालना नांदेड द्रुतगती महामार्गाचे भूसंपादन अंतर्गत सेलू तालुक्यातील ५० भुधारक यांना कलम १९ (ब) अन्वये समंती देणेबाबत उपविभागीय अधिकारी सेलू यांच्या मार्फत दि 10 एप्रिल रोजी नोटीस पाठवून सदरील भूधारकांनी २१ एप्रिल पर्यंत ताबा न दिल्यास कार्यवाहीचा इशारा नोटीसद्वारे देण्यात आला होता परंतु आता या मुदतीस एक दिवसाची वाढ देण्यात आली असून सदर भूधारकांनी 22.04.2026 रोजी दुपारी 5.15 या कार्यालयीन वेळे पावेतो त्यांचे जमीनीचा ताबा दयावा, अन्यथा ताबा घेण्याच्या अनुषंगाने नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे अशी माहिती उपविभागीय दंडाधिकारी शैलेश लाहोटी यांनी दिली.
या बाबत मा.उच्च न्यायालय खंडपीठ, छत्रपती संभाजीनगर यांनी देखील रिट याचीका क्रमांक ३७०३/२०२५ अनिरुध्द नाईक विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर १८ रिट याचीकेमध्ये दिनांक १७.०२.२०२६ रोजी निर्णय दिलेला असून सदर निर्णयामध्ये भुसंपादन अनुषंगाने महाराष्ट्र महामार्ग १९५५ मधील तरतुदीचे काटेकोरपणे पालन करुन जमीनीचे ताबे घेण्यासाठी कार्यवाही करणे बाबत निर्देश दिलेले आहेत.