परभणी ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSCERT), पुणे यांच्या वतीने शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेत, बोरगाव येथील नितीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे कलाशिक्षक श्री. संतोष शिवाजीराव ताल्डे यांनी द्वितीय क्रमांक पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
परभणीच्या ‘डाएट’मध्ये रंगली स्पर्धा शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही स्पर्धा परभणी येथील जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (DIET) येथे दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण राज्यातून अनेक स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत श्री. ताल्डे यांच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या विषयावरील कलाकृतीने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. श्री. संतोष ताल्डे यांनी आपल्या पोस्टर मधून एआयचा तंत्रज्ञानाचा वापर प्रामुख्याने मानवी आरोग्य, शिक्षण व शेती यामध्ये केला तर संबंध मानव जातीसाठी त्याचा फायदा होईल. अशा प्रकारची प्रभावी मांडणी पोस्टमध्ये केली होती. डायटचे प्राचार्य श्री सुदर्शन चिटकुलवार , प्रा. प्राचार्य प्रल्हाद खुणे, प्रा. वाघ, प्रा. जाधव, केशव लगड आदींनी संतोष ताल्डे यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन पारितोषिक प्रदान करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी केंद्रप्रमुख तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. श्री राजेंद्र काका लहाने, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.