आपला जिल्हा

श्री संत गोविंद बाबा मठात अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन

सेलू (प्रतिनिधी) येथील श्री संत गोविंदबाबा महाराज (दादुपंथी ) यांच्या पुण्यतिथी निमित्त मठ संस्थानामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व प्रवचनाचे आयोजन दिनांक 16 जानेवारी ते 23 जानेवारी या कालावधीत करण्यात आले आहे.

या अखंड हरिणाम सप्ताहात सकाळी 4 ते 6 काकडा भजन, 8 ते 10 ज्ञानेश्वरी प्रवचन, 10 ते 12 गाथा भजन, 4 ते 6 ज्ञानेश्वरी प्रवचन, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ, रात्री 8 ते 11 किर्तन व रात्री 12 ते 04 हारे जागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हभप एकनाथ महाराज हातडीकर, हभप केकते महाराज आंबा, हभप विष्णू महाराज यदलापूरकर, हभप विष्णू महाराज कानडी,हभप प्रभूदेवा यदलापूर , श्रीरंग महाराज बाहेगावकर, हभप बापुराव महाराज परतूरकर यांचे शुक्रवार दिनांक 23 जानेवारी रोजी काल्याच्या किर्तन व महाप्रसादाने अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता होणार आहे. तरी जास्तीत जास्त हरिभक्तांनी अखंड हरिनाम सप्ताह व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत गोविंद बाबा मठसंस्थान सेलू यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!