आपला जिल्हा

नूतन विद्यालय संस्काराचे विद्यापीठ : श्याम मणियार

५३ वर्षांनंतर शालेय परिसरात जागवल्या आठवणी

सेलू  ( प्रतिनिधी ) नूतन विद्यालय हे संस्काराचे विद्यापीठ असून आम्ही त्या शाळेचा अंश असल्याचा आम्हाला अभिमान आहे. समर्पण, त्याग, निष्ठा, देशभक्तीचे संस्कार प्रशालेने आमच्यावरती केल्यामुळेच आम्ही आज आमच्या जीवनात स्वाभिमानाने उभे आहोत. अशी भावना माझी विद्यार्थी श्याम मणियार यांनी व्यक्त केली. नूतन विद्यालयातील १९७२ च्या माजी विद्यार्थ्यांनी रविवार ( दि. १४ ) रोजी शाळेस भेट दिली.

वर्ग मित्रांसोबत प्रभात फेरीने बालाजी मंदिरापासून नूतन विद्यालयात माजी विद्यार्थी आले. ५३ वर्षानंतर आपली शाळा पाहून ते भारावून गेले. शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांनी वाजत गाजत माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळेच्या वतीने शब्दरूपी भावनांचे सन्मानपत्र, शालेय दैनंदिनी, गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. ५३ वर्षांनी नव्याने बालपण, विद्यार्थीदशा अनुभवत प्रार्थना, राष्ट्रगीत, राज्यगीत आणि प्रतिज्ञा म्हटली. स्नेहमिलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया हे होते. तर व्यासपीठावर नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डी.के. देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, कार्यकारणी सदस्य नंदकिशोर बाहेती, दत्तराव पावडे, अजिज खाँ पठाण, राजेश गुप्ता, माजी विद्यार्थी हेमंतराव आडळकर, उद्योजक रामप्रसाद घोडके, मुख्याध्यापक संतोष पाटील, निशा पाटील, उल्हास पांडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात डॉ. सुभाष परताणी यांनीही आपली भावना व्यक्त केली. सेल्फी पॉईंट मध्ये फोटो काढण्याचा माजी विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुरेश हिवाळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!