परभणी (प्रतिनिधी) : एन. व्ही. एस. मराठवाडा हायस्कूलच्या सेमी हिंदी विभागात शनिवार, दि. 13 सप्टेंबर रोजी हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य अनंत पांडे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून हिंदी भाषेचे जाणकार विजयकुमार तिवारी उपस्थित होते. सेमी हिंदी विभागाचे पर्यवेक्षक आरळकर व सहपरिवेक्षक साळवे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. प्रमुख अतिथींचे स्वागत प्राचार्य पांडे यांनी शाल, श्रीफळ, पुष्पहार व ग्रंथभेट देऊन केले. प्रास्ताविकात आरळकर यांनी हिंदी दिन साजरा करण्यामागील भूमिका स्पष्ट केली तसेच अतिथींचा परिचय करून दिला. विद्यार्थिनी कु. पूजा डुकरे व कु. प्रज्ञा धायजे यांनी हिंदी दिनावरील प्रभावी भाषणे सादर केली. इयत्ता ५ वी ते १० वीतील विद्यार्थ्यांनी बुंदे, तुफानो से क्या डरना जी, बंदर का धंदा, गाव शहर, निर्मानोके पावन युग में, हिंदी बोलने से हम शर्माते हैं अशा कविता सादर करून वातावरण भारावून टाकले. विद्यार्थी अवनी केळकर, हर्षदा बनसोडे, श्रावणी गायकवाड, भावेश शेळके, करण पेंढारकर, नील घोडके, आयुष आदमाने, वरद जोंधळे, कार्तिक कांबळे यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते झाले. या कार्यासाठी हिंदी विषय शिक्षक साळवे, खिल्लारे व भारती सरांचे मार्गदर्शन लाभले. संस्कारमूल्यांवर आधारित “सोना और लोहा” या नाटिकेचे सादरीकरण शिक्षा नारायणकर व श्रावणी फुलपगार (इयत्ता ७ वी) यांनी केले. त्यांना सौ. घोडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थी वरद जोंधळे यांनी हिंदी मुहावरे व त्यांचे अर्थ सादर केले. यावेळी तिवारी यांनी हिंदी ही भारतातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असल्याने ती दैनंदिन जीवनात वापरणे गरजेचे असल्याचे सांगितले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य पांडे सरांनी हिंदी भाषा भारतीय संस्कृती जपणारी असून प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अंजली पाटील हिने केले, तर आभार प्रदर्शन वर्गशिक्षक सागर सुडके यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप हिंदी घोषवाक्यांनी झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिक्षक नागरे, कटारे, गायकवाड मॅडम, जंगम, देशपांडे व संगीत शिक्षक धानोरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.