गंगाखेड ( प्रतिनिधी ) आज रविवार दि. 31 ऑगस्ट रोजी भटके विमुक्त दिना निमित्त वाघदरा तांडा येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
त्याच बरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती वर्ष उस्थात साजरी करण्यात आले.
प्राथमिक माध्यमिक आणि उच्य माध्यमिक आश्रम शाळा वाघदरा तांडा येथील सर्व आनिवासी व निवासी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकारी पनवेल डॉ. विष्णू राठोड यांच्याकडून करुन घेण्यात आले या याप्रसंगी बंजारा लोकगीत लोककला असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमासाठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे प्राचार्य व सर्व शाळेचे शिक्षक प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.