आपला जिल्हा

भटके विमुक्त दिवस निमित्त जात प्रमाणपत्र व विद्यार्थ्यांचा सन्मान.

जिल्हाधिकारी व इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयात कार्यक्रम संपन्न.

परभणी (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी कार्यालय व इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय यांचे वतीने जायकवाडी वसाहत सामाजिक न्याय भवन परभणी येथे रविवारी भटके विमुक्त दिवस निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात लाभार्थ्यांना व्हिजेएनटी चे जात प्रमाणपत्र व विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना फुले समग्र वाडमय खंड देऊन सन्मानित करण्यात आले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त विविध स्पर्धा बक्षिस वितरण व भटके विमुक्त दिवस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार विष्णु पकवाने होते.तर प्रमुख व्याख्याते म्हणुन सुरेश देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुणे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राजू एडके, ऋषिकेश सुकुमार ,इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक रामेश्वर मुंडे,इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी शेख अजमेर,सहाय्यक लेखाधिकारी वामन काकडे, मंडळाधिकारी विजय राठोड,निरीक्षक तुकाराम भराड,निरीक्षक दत्ताहरी कदम यांची उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ,महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन केले.यावेळी क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले वांडमय देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रांत अधिकारी तथा तालुका दंडाधिकारी तहसील कार्यालय परभणी अंतर्गत व्हिजेएनटी स्पेशल जात प्रमाणपत्र अंतर्गत घेण्यात आलेल्या कॅम्पमधील १९ लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते व्हिजेएनटी चे प्रमाणपत्र आणि फुले समग्र वांडमय खंड देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त ४० आश्रमशाळा व इतर मागासवर्ग शासकीय मुलांचे वसतिगृह व इतर मागासवर्ग शासकीय मुलींचे वस्तीगृह येथे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पोवाडा स्पर्धा, माहितीपट वकृत्व स्पर्धेतील ३७ विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय १० वी ,१२ वी कला व विज्ञान शाखा परीक्षेतील गुणाानुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.तर १५० दिवसाच्या कृती आराखड्यानुसार काम करणाऱ्या आश्रमशाळेमधुन प्राथमिक आश्रमशाळा मालेवाडी, माध्यमिक आश्रमशाळा राणीसावरगाव,उच्च माध्यमिक आश्रमशाळा वालूर येथील मुख्याध्यापकांना मान्यवरांच्या हस्ते प्रथम क्रमांक चे प्रशस्तीपत्र व समग्र खंड देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्राथमिक आश्रमशाळा वालूर येथी भक्ती रोकडे हिने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनपटावर आधारित पोवाडा सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.अशोक पिसाळ यांनी भक्ती रोकडे हिचा सन्मान केला. सूत्रसंचालन आर.एस. साळेगावकर यांनी केले.गणेश जाधव यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने सांगता झाली.यावेळी आश्रमशाळा मुख्याध्यापक, शिक्षक व शासकीय वसतीगृहातील कर्मचारी उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

▪️भटके विमुक्त समाजाचा सन्मान दिवस : रामेश्वर मुंडे.
ब्रिटिश सरकारला विरोध करण्यात अग्रेसर असलेल्या भटक्या विमुक्त समाजाची भुमीका महत्वाची असल्याने ब्रिटिश ने भटक्या जमाती गुन्हेगार कायदा १८७१ साली आणला.त्यामुळे हा समाज दोन ते तिन पिढ्या अमानुष अत्याचार सहन करावा लागला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ३१ आँगष्ट १९५२ रोजी भारत सरकारने इंग्रजांनी केलेला भटक्या जमाती गुन्हेगार कायदा रद्द करून या समाजाला मुक्त केले. म्हणून शासनाने हा दिवस भटके विमुक्त दिवस साजरा करून त्यांचा सन्मानाचा उपक्रम आहे असे मत प्रास्ताविक करतांना इतर मागास बहुजन कल्याण चे सहाय्यक संचालक रामेश्वर मुंडे यांनी व्यक्त केले. यावेळी सुरेश देशमुख यांनी भटक्या जमातीतील समाजाबद्दल सविस्तर विस्ताराने मार्गदर्शन केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!