लातूर ( प्रतिनिधी) दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी माळी सेवा संघाचे मुख्य कार्यालय PVR चौक लातूर येथे आयोजित केलेल्या बैठकीत लातूर जिल्ह्यातील सकल ओबीसी समाजाचे धोक्यात आलेल्या आरक्षणाविषयी बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीत दिनांक ३० ऑगस्ट २०२५ पासून महात्मा गांधी चौक लातूर येथे दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळात धरणे आंदोलन करण्याचे निश्चित झाले. सदर बैठक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे लातूर जिल्हाध्यक्ष श्री भारत काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेचे राज्य सरचिटणीस हरिभाऊ गायकवाड, राष्ट्रीय ओबीसी महासंघ राज्य समन्वयक, मार्गदर्शक श्री अजित निंबाळकर, परीट समाजाचे अध्यक्ष रंगनाथ घोडके, भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे तथा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मराठवाडा कार्याध्यक्ष श्री श्रीकांत मुद्दे, भटक्या विमुक्त जोशी जाती संघटनेचे नेते शिवाजीराव जोशी, प्रा. लक्ष्मण बादाडे सर, यलम समाजाचे नेते लक्ष्मण पोटे, बाळासाहेब फासे, महेश क्षीरसागर, न्हावी समाजाचे युवा नेते अमोल सावंत, पांडुरंग माळी इत्यादी मान्यवर ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.