आपला जिल्हा

गोमातेला राष्ट्रीय पशु म्हणून सन्माननिय दर्जा व गोहत्या गोवंश रक्षण कायद्याची अंमलबजावणी करा

सेलू ( प्रतिनिधी ) गोमातेला राष्ट्रीय पशु म्हणून सन्माननिय दर्जा व गोहत्या गोवंश रक्षण कायद्याची अंमलबजावणी करा अशी मागणी उपविभागीय अधिकारी सेलू यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली.

दिलेल्या निवेदनात भारतीय संस्कृतीत गाय या प्राण्याला अनन्यसाधारण असे महत्त्व असून तिला हिंदू धर्म संस्कृतीत देवतेचे व मातेचे स्थान आहे, त्यामुळे आपण गायीला गौमाता म्हणतो व कुणीही आपल्या मातेची, देवतेची हत्त्या केलेली सहन करुच शकत नाही! या वस्तुस्थितीस अनुसरून तिच्या जीविताचे रक्षण करुन तिला राष्ट्रीय पशुचा दर्जा देऊन सन्मानित करणे आपले आद्य कर्तव्य आहे.

परंतु सद्यपरिस्थितीत जागोजागी गोहत्या चे प्रमाण वाढले आहे, व खुले आम ट्रकच्या ट्रक भरून गायीचे कत्तलखान्यात रवानगी केली जात आहे. हिंदू धर्म संस्कृतीला ही अतिशय काळीमा फासणारी बाब आहे, यावर निर्बंध न घातल्यास आपल्या गोवंशाचा नाश होऊन, पर्यायाने आपल्या शेतीप्रधान देशाच्या शेती पूरक व्यवसायाची सुध्दा हानी होत गंभीर परिस्थिती निर्माण होऊन, गोमातेचे अमृता समान दुध सुध्दा उपलब्ध न झाल्यास आपले आरोग्य धोक्यात येईल. तसेच गाईचे गोमूत्र औषधी आहे, गाईचे शेण ही खूप उपयुक्त आहे, शेणखत सुध्दा शेतीसाठी खूप आवश्यक आहे, एकंदरीत गाय ही सर्व दृष्टीने बहुपयोगी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सुध्दा खूप आवश्यकंच आहे.

सध्याच्या लग्नसराईच्या काळात उरलेले अन्न मोकळे टाकले तर काय हरकत आहे, पण तेच अन्न प्लास्टिकच्या कैरीबग मध्ये बाहेर टाकण्याची प्रथा रुढ झाली आहे ती सर्वस्वी चुकीची आहे कारण प्लास्टिक कॅरीबॅग मध्ये टाकलेले अन्न मुक्या जनावराच्या पोटात जाते व त्यामुळे अनेक जनावरे गाई वासरे मृत्युमुखी पडतात ही सुध्दा गंभीर बाब आहे. त्यास प्रतिबंधक उपाय करणे सुध्दा आवश्यक आहे.

याबाबत शासनाने गोवंश रक्षणासाठी कठोरपणे कायदा करून त्याची त्वरित अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे आहे! निवेदनावर ज्येष्ठ नागरिक सेवा संघ सेलू शाम ए सरगम संगीत परिवार सेलू. शांतिदूत परिवार पुणे शाखा सेलू डि. व्ही. मुळे (अध्यक्ष) कार्याध्यक्ष शामसुंदर आढे (कार्याध्यक्ष) उपेंद्र बेलूरकरअशोक वानरे (उपाध्यक्ष),श्री दु.का.कुलकर्णी(सचिव), पद्माकर कुलकर्णी (कोषाध्यक्ष), आनंद बाहेती, विनोद मोगल, प्रदीप शिंदे (सहसचिव) आणि श्री संत गोविंद बाबा दादुपंथी मठ गोशाळा सचिव श्री राजेन्द्रजी करवा यांच्या स्वाक्ष-या आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!