आपला जिल्हा

शारदा विद्यालयाचा 10 वी चा 81. 81% निकाल

सेलू (प्रतिनिधी ) येथील कै.सौ. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयाचा मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल 81. 81% लागला असून निकालाची व उज्ज्वल यशाची परंपरा याही वर्षी कायम राखाली आहे.

कु.अनुराधा दिगांबर मिंड 78.20% (प्रथम), कु. साक्षी विष्णू काळे 68% (द्वितीय),तर चि.महादेव काशीनाथ खाकरे 67.60% (तृतीय) क्रमांक मिळवला आहे.
परिक्षेसाठी एकुण बावीस विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्या पैकी 18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व विद्यार्थी शेतमजूर व श्रमजिवी प्रवर्गातील असून प्रतिकुल परिस्थितीतून विद्यार्थ्यानी मिळवलेले यश कौतुकास्पद आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकवृंदाचे संस्थेचे अध्यक्ष श्रीरामनाना पाटील, उपाध्यक्ष श्रीबल्लभजी लोया, सचिव चंद्रप्रकाश सांगतानी, सहसचिव दिपकराव खराबे, प्रशासकीय अधिकारी श्री चंद्रशेखर नावाडे व सर्व संचालक ,मुख्याध्यापक डी.डी. शिंदे, मुख्याध्यापिका सौ उषा कामठे यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!