आपला जिल्हा

गोमाता- संवाद यात्रेत सहभागी व्हावे- नितीन चिलवंत

सेलू (प्रतिनिधी ) महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन द्वारा आयोजित राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचे 31 मे ते 14 जून या कालावधीत आयोजन करण्यात आले असून सोमवार दिनांक 11 मे रोजी दुपारी 4 वाजता ही संवाद यात्रा मानवत तालुक्यातील श्री क्षेत्र ऋषीश्वर महाराज समाधीस्थळ दुधना बेट मगर सावंगी येथे महाराष्ट्रात पहिल्यांदा येणार असून या संवाद यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन नितीन चिलवंत व मुकुंद मगर यांनी केले आहे.
भारतीय संस्कृतीचा कणा आणि मानवी आरोग्याचे उगमस्थान असलेल्या देशी गोवंशाचे महत्व जाणून घेण्यासाठी पुरुषोत्तम मासा निमित्य गोसंवाद यात्रे निमित्य गो माता महाआरती, महापुजन सोहळा, गो माता विजय संस्कृती गोपुजन, गोपालकांचा स्नेह मेळावा गो संस्कृती नोंदणी अभियान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमात गोसेवकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा यांनी केले असून आयोजक नितीन चिलवंत, मुकुंद मगर व संयोजन समितीच्या वतीने करण्यात गो संवाद यात्रेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले जात आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!