आपला जिल्हा

वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करणे आपली सामूहिक जबाबदारी – डॉ. रामेश्वर नाईक

परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे जिंतूरमध्ये वैज्ञानिक जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविणार

जिंतूर (प्रतिनिधी ) : परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी (PAS) जिंतूर सोसायटीच्या वतीने विज्ञानप्रेमी शिक्षक, पालक, विद्यार्थी व नागरिकांची बैठक पोदार जंबो किड्स, गुरुदेव नगर, जिंतूर येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत विज्ञान प्रचार व प्रसार, खगोलशास्त्राविषयी जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन तसेच विविध विज्ञानाधारित उपक्रम आणि प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. दुर्गादास कान्हडकर होते. प्रमुख अतिथी म्हणून परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर नाईक, सचिव सुधीर सोनूनकर, ॲड. मनोज सारडा, केंद्रप्रमुख के. सी. घुगे, प्रसाद वाघमारे, अशोक लाड व अनंत लाड उपस्थित होते. तसेच पंडितराव कवडे, किरण नाईक, कपिल घुगे, एकनाथ काळे, सचिन हजारे, सखाराम चव्हाण, अमोल सोनटक्के, विजय गीते, तुकाराम काळे, मुंजाभाऊ मोरे, प्रा. प्रकाश घुगे, गजानन बुधवंत, श्रीमती मनिषा वाघमारे, सुरेखा काळे, इंजि. आशा दराडे व श्रीमती वावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना डॉ. रामेश्वर नाईक यांनी “वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी असून विज्ञानाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन केले.

बैठकीत जिंतूर तालुक्यात विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यामध्ये कार्यकारी समिती, प्रचार व प्रसार समिती, आयोजन समिती, संपर्क समिती, तांत्रिक समिती, व्यवस्था समिती तसेच महिला व युवा समितीचा समावेश असून प्रत्येक समितीसाठी प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. भविष्यात विज्ञान वारी, खगोल निरीक्षण शिबिरे, विज्ञान प्रदर्शन, वैज्ञानिक जनजागृती मोहीम अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी PAS जिंतूर तालुका समन्वयक प्रकाश डुब्बे, बाळू बुधवंत यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!