आपला जिल्हा

श्री.के.बा.विद्यालयाचा ९६.९६ टक्के निकाल –१२ विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण

सेलू ०९(प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९६.९६ लागला असून यशाची चढती परंपरा शाळेने राखली आहे.या विद्यार्थ्यांमध्ये ममता मुरलीधर खरात (९०.४०)शाळेतून सर्वप्रथम,ऋतुजा सुदर्शन मोरे(८९.४०) द्वितीय, सुरभी सुरेश उगले(८९.२०)तृतीय क्रमांक पटकावला आहे.तर अर्चना अरुण भले(८८.२०),तेजस अण्णासाहेब काळे(८६.४०),ईश्वर अशोक काळे(८४.००),बळीराम चंद्रकांत काळे(८३.००),सई कृष्णा कटारे(८२.६०),साधना ज्ञानेश्वर होगे(७९.८०),श्रुती दिगंबर काकडे(७८.६०),मयुरी संतोष खरात(७७.६०),रोहित ज्ञानेश्वर साबळे(७५.४०) हे विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.विशेष प्राविण्य श्रेणीत १२ विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत २४ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ऍड.अनिरुद्ध जोशी,उपाध्यक्ष डॉ.सुनील कुलकर्णी,सचिव महेश खारकर,सहसचिव अभय सुभेदार,कोषाध्यक्ष ललित बिनायके,सदस्य ऍड.किशोर जवळेकर,जयंत दिग्रसकर,विष्णूपंत शेरे,रामेश्वर राठी,प्रवीण माणकेश्वर,डॉ प्रवीण जोग,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संजय धारसुरकर,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके आदींसह शिक्षक कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!