सेलू ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या SSC परीक्षेचा निकाल आज दिनांक ८ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आला.
यात नूतन विद्यालय शिक्षण संस्थेतील मैथिली अनिल गावंडे या विद्यार्थिनीने 99.20% घेऊन प्रथम क्रमांक पटकावला. तर 52 विद्यार्थ्यांनी 90% च्या वर गुण घेऊन यश संपादन केले आहे.
यात बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल चा निकाल 100% लागला,श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला सेलू यांचा निकाल 96.14% टक्के तर नूतन विद्यालयाचा निकाल 87.57% लागला आहे.
नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या घटक संस्थेतील दहावी परीक्षेत प्रविष्ट विद्यार्थी ८३३, उत्तीर्ण विद्यार्थी ७५८ एकुण निकाल ९१ टक्के सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, नूतन कन्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर बाहेती , प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, शालेय समितीचे अध्यक्ष सिताराम मंत्री, प्राचार्य नरेंद्र पाटील, मुख्याध्यापिका निशा पाटील मुख्याध्यापक संतोष पाटील, आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.