आपला जिल्हा

नूतनची दहावीच्या निकालात यशस्वी भरारी

प्रशालेतून प्राची प्रथम, महेश, मधूश्री, दर्शना द्वितीय

सेलू ( प्रतिनिधी ) येथील नूतन विद्यालयाचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ८७.५७ टक्के लागला असून प्रशालेने इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालात यशस्वी भरारी घेतली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवार ( दि.८ ) रोजी रोजी जाहीर झाला.

नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित नूतन विद्यालयातील एकूण ५१५ विद्यार्थ्यांपैकी ४५१ विद्यार्थी दहावी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून प्रशालेचा निकाल ८७.५७ टक्के लागला आहे. आपल्या यशस्वी निकालाची परंपरा कायम राखत नूतन विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्राची बाळासाहेब शिंदे ( ९७.२०), महेश राजेभाऊ गिराम (९६.६०), मधुश्री धनंजय आष्टीकर (९६.६०), दर्शना रेणुकादास जोशी (९६.६०), आर्या भाऊराव घांडगे ( ९६) टक्के घेऊन या विद्यार्थ्यांनी प्रशालेतून अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त केला. तर १९ विद्यार्थी ९० टक्के गुणांसह उत्तीर्ण झाले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, कार्यकारिणी सदस्य नंदकिशोर बाहेती, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, शालेय समितीचे अध्यक्ष सिताराम मंत्री, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक , आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!