आपला जिल्हा

परभणीत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने जिल्हा कचेरी समोर केले आंदोलन

परभणी ( प्रतिनिधी ) शिक्षकांचे अनेक प्रश्न व मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत याकडे अधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप करत या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज गुरुवारी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणे, नियोजित पट पडताळणी चा कार्यक्रम रद्द करण्यात यावा, संच मान्यतेतील त्रुटीचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्यात यावेत, मासिक वेतनासाठी होणारा विलंब दूर करावा, शिक्षकांची थकीत देखील त्वरित अदा करण्यात यावे आदिमान्यासह निवडणूक कामात शिक्षकांचा वापर करण्यात येऊ नये अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते. 

Related Articles

Back to top button
Don`t copy text!