सेलू ( प्रतिनिधी ) सेलू तालुक्यातील रवळगाव येथील अनिकेत राम रोडगे यांच्या पत्नी शुभदा अनिकेत रोडगे हिचे गुरुवार १६ एप्रिल २०२६रोजी जर्मनीमधील म्युनिक येथील मानल्या जाणाऱ्या कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून निवड झाली आहे. या कंपनीमध्ये रुजू झाल्याची माहिती रवळगाव सह सेलू तालुक्यात कळताच तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. ड्रॉइंट एअर क्राफ्ट ही एक जर्मनीमधील अग्रगण्य विमान निर्माण कंपनी असून ती आधुनिक पर्यावरण पूरक व लढाऊ तसेच प्रवासी विमानाच्या विकास व निर्मितीत विशेष प्रविण आहे. सदरील कंपनी ही गुणवत्ता नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासासाठी ओळखली जाते. शुभदा रोडगे हिचे शिक्षण एम. एस. मेकॅनिकल इंजिनियर यू.के. लंडन येथे झाल्यानंतर तिचा विवाह परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात असलेल्या रवळगाव येथील अनिकेत राम रोडगे यांच्याशी झाला. शुभदा रोडगे हिचे सासरे राम रोडगे हे जालना येथे उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर पती अनिकेत रोडगे जर्मनीमध्ये डिओलट या कंपनीमध्ये काम करतात. आज गुरुवार १६ एप्रिल रोजी शुभदा रोडगे यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रवळगावच्या सुनाने घेतलेल्या या यशस्वी झेपे बद्दल शुभदा रोडगे व सह रोडगे परिवारावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.