सेलू ( प्रतिनिधी ) येथील शिक्षण विभाग, पंचायत समितीच्या वतीने संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी व खुल्या गटासाठी तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण मंगळवार ( दि. १४ ) एप्रिल रोजी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात झाले. पाचवी ते दहावी या शालेय गटात ज्ञानदा खपले ( कन्या शाळा,वालूर), सान्वी शितळे (नूतन विद्यालय), ऋतुजा बोंबले ( पी.एम.श्री. डासाळा) या विद्यार्थीनींनी आणि खुल्या गटात उध्दव कंठाळे ( जि. प्रा.शा. बोरकीनी), किर्ती राऊत (नूतन कन्या प्रशाला), आदिती आंबेकर ( नूतन विद्यालय ) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक तर महाविद्यालयीन गटात वैष्णवी गवारे ( नूतन महाविद्यालय ), उर्मिला मोगल या विद्यार्थीनींनी उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. यशस्वी स्पर्धकांचा गटविकास अधिकारी उदय जाधव, गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे यांनी सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला. निबंध लेखन स्पर्धेचे परीक्षक म्हणून केंद्र प्रमुख एकनाथ जाधव,नूतन विद्यालयातील सहशिक्षक डॉ. सुरेश हिवाळे, जिल्हा परिषद प्रशाला येथील शिक्षक डॉ. शरद ठाकर (केमापुर), सुमिता सबनिस ( कुंडी), माधव गव्हाणे ( रायपूर ), श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील सहशिक्षिका डॉ. जयश्री सोन्नेकर यांनी काम पाहिले. कार्यक्रमास केंद्र प्रमुख एकनाथ जाधव, नूतन विद्यालयाचे पर्यवेक्षक गणेश माळवे, अरूण राऊत, जनार्दन कदम, विजय सोंजे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश बोरगांवकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन मधुकर काष्टे यांनी केले.