सेलू ( प्रतिनिधी ) सेलू शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
सेलू नगरपालिकेसमोर असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी सेलूतील नागरिकांनी अभिवादन करून त्यांच्या जयंतीदिनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सेलूचे उद्योजक तथा नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सहसचिव जयप्रकाश बिहाणी, डॉ शरद कुलकर्णी, किशोर जोशी, अशोक अंभोरे, डॉ.विलास मोरे, भुजंग थोरे, श्याम कटारे, प्रभाकर इंगळे सह मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले.