सेलू ( प्रतिनिधी ) आज सेलू येथे काँग्रेस पक्षाचे संघटन सृजन अभियान अंतर्गत बैठकीचे आयोजन शहरातील साईबाबा नागरी बँके च्या मुख्य कार्यालया मध्ये दि. 12 एप्रिल रविवारी दुपारी 12.00 वाजता आयोजित करण्यात आली होती.
सेलू तालुका व शहराच्या वतीने केंद्रीय निरीक्षक अजमतुलाह हुसेनी सहाब केंद्रीय परभणी जिल्ह्याचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, पक्ष निरीक्षक जितेंद्र देहाडे सेलू तालुका काँग्रेस पक्षाचे निरीक्षक श्री देवकते साहेब,दादा साहेब मुंढे आलमगीर खान,बाळासाहेब देशमुख सिद्धार्थ भाऊ हत्तीआंबिरे,अजित वरपुडकर,मुजाहेद खान,नागसेन भेरजे सेलू तालुका अध्यक्ष श्री हेमंतराव आडळकर तसेच नगरपालिकेचे गटनेते तथा माजी नगराध्यक्ष श्री पवन आडळकर, नगरसेवक श्री मिलींद पवार,अमजद बागवान,अन्वरखान,विनोद धापसेआत्माराम साळवे,मुश्ताक रब्बानी ,विनोद तरटे,नृसिह हरणे,रमजानी बागवान,बासु कच्ची,पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांचे स्वागत सेलू शहर व काँग्रेस पक्षाच्या वतीने हेमंतराव आडळकर यांनी केले कार्यक्रमाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी व पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी नगराध्यक्ष श्री हेमंत आडळकर यांनी केले सूत्रसंचालन इरफान जमीनदार यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.