सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथील नावाडे गल्ली येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या जेष्ठ महीला गं . भा . श्रीमती मंदाकिनीबाई सदाशिवअप्पा नावाडे यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी दि ५ एप्रील रोजी सकाळी दोन वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मूले , दोन मुली , सुना , नातवंडे , जावई असा मोठा परिवार आहे . त्या माजी क्रिडा शिक्षक सतिश नावाडे व भाजप किसान मोर्चाचे सेलू शहरअध्यक्ष महेश नावाडे यांच्या मातोश्री होत त्यांच्यावर तहसील रोडवर असलेली स्मशान भूमि ‘शांतिधाम ‘ येथे अतिंम संस्कार करण्यात आले . उपस्थिता च्यावतीने विविध संस्थाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .