आपला जिल्हा

देशभक्त, संविधान प्रेमी नागरिकांनी संविधानाच्या रक्षणास्तव सदैव जागरुक राहावे – प्रा. शेख महेमुद सर

सेलू ( प्रतिनिधी ) जगातील सर्वश्रेष्ठ संविधान हे भारतीय संविधान असुन त्यामुळेच भारतीय नागरीकांचे अधिकार अबाधित आहेत‌‌. संविधानाचे रक्षण आपल्या प्राणापेक्षाहि अधिक करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सेलू येथील जेष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते प्रा. शेख महेमुद सर यांनी केले आहे‌.
त्रिरत्न बौध्द विहार तुळजाभवानी नगर वांगी रोड परभणी येथे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत 6 वे पुष्प गुंततांना व्याख्याता म्हणून प्रा. शेख महेमुद सर यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान आणि वर्तमान परिस्थिती या विषयावर प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब शेरखाने तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. परविन कनकुटे सर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!