सेलू प्रतिनिधी परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथील विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक जागृती करण्यासाठी आज दिनांक 4 एप्रिल शनिवार रोजी ईद मिलन आणि सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात, रमज़ान महिन्याचे संपूर्ण रोज़े ठेवणाऱ्या 51 भाग्यवान विद्यार्थ्यांना आणि आयुष्यातला पहिला रोज़ा ठेवणाऱ्या 45 लहान विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके आणि सत्कार करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेलू शहरातील मदिना मस्जिदचे इमाम मौलाना हाजी मोहम्मद रईस खासमी साहब उर्फ ख्वाजा मौलाना यांनी भूषवले. दारुल उलूम फुरखानिया सेलूचे प्रमुख हाजी मौलाना मोहम्मद सादिक नदवी साहब, बेलदार समाज सेवा मंडळाचे परभणी जिल्हा अध्यक्ष शेख कलीम बेलदार, नगरसेवक शेख शफीक, राहत बँक सेलूचे व्यवस्थापक शेख जलील, शेख अयुब, अबरार बेग, शेख असद टेलर यांच्यासह सेलू शहरातील इतर मान्यवर विशेष अतिथी म्हणून सहभागी सहभागी होऊन त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थी अनस शेख अनीस याच्या पवित्र खूरआण पठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर शेख उमिझ अशफाक यांनी त्याचे भाषांतर सादर केले.
आशिया शेख अशरफ आणि अलीशा अयुब पठाण यांनी नात सादर केली.कार्यक्रमाची उद्दिष्ट्ये आणि हेतू स्पष्ट करताना, डॉ झाकिर हुसेन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अल-हाज मोहम्मद अब्दुल अलीम सोफी सर म्हणाले की, मुलांमध्ये धार्मिक भावना रुजवण्यासाठी गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही पुरस्कार मालिका सुरू ठेवण्यात आली आहे. मौलाना सादिक नदवी साहब यांनी आपल्या भाषणात या उपक्रमाला प्रशंसनीय म्हटले आणि सांगितले की, डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळेसाठी मुलांमध्ये धार्मिक जागृती निर्माण करणे ही काळाची गरज आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष मौलाना रईस खासमी साहब यांनी सर्व शिक्षक आणि पालकांचे आभार मानले आणि प्रार्थना करून मुलांना आशीर्वाद दिला. ईद मिलन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख अहेमद, शेख रिझवान, हाफेज़ जुनैद नदवी, इरशाद खान, शेख लईख, सय्यद शफीक , सय्यद हमीद भाई, सय्यद साबेर आणि सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले. शेवटी डॉ झाकीर हुसेन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल अलीम सोफी सरांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. समारंभानंतर, सर्व उपस्थितांना शिर खुरमा देण्यात आला, ज्याचा सर्व पाहुण्यांनी आणि विद्यार्थ्यांनी आनंद घेतला.