आपला जिल्हा

क्युरियस किड्स व फिनकिड्स शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

सेलू( प्रतिनिधी ) : क्युरियस किड्स व फिनकिड्स शाळेचा लहानग्यांचा पदवीदान समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात दि. ४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शाळेच्या प्रांगणात यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला असून, हा दिवस सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.

या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून, श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. संजय रोडगे, डॉ. सविता रोडगे, डॉ. आदित्य रोडगे
तसेच, मुख्याध्यापिका प्रगती क्षिरसागर, प्राचार्य कार्तिक रत्नाला यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली. विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या मुलांच्या यशाचा आनंद साजरा करताना दिसले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे आणि नृत्य सादरीकरण करून उपस्थितांचे मने जिंकली. लहानग्यांचा आत्मविश्वास आणि उत्साह पाहून सर्वांनी त्यांचे कौतुक केले.
समारंभात विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी शिक्षकांनी घेतलेले परिश्रम आणि पालकांचे सहकार्य यांचा विशेष उल्लेख करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एका नवीन प्रवासाची सुरुवात झाली असून, हा दिवस विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी आनंद, अभिमान आणि समाधानाचा क्षण ठरला.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!