परभणी:जातीअंताची लढाई लढणा-या महानायकांची जयंती सर्वधर्मीय, संविधानप्रेमी नागरिकांच्या सामूहिक समन्वयातुन साजरी करण्याचा अनोखा पायंडा गत आठरा वर्षा पासुन परभणीत सुरु आहे. 2026 या वर्षाची कार्यकारिणी निवडण्यासाठी दि. 29 मार्च रोजी सावली, शासकीय विश्रामगृह, परभणी येथे ज्येष्ठ साहित्यिक दि.फ.लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या व्यापक बैठकीत महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी समीर गणेशराव दुधगावकर,
कार्याध्यक्षपदी डाॅ.सुनिल जाधव व
प्रा.डाॅ.सुरेश हिवराळे, मुख्य समन्वयक पदी अनिताताई सरोदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या वेळी महोत्सव समितीचे निमंत्रक यशवंत मकरंद यांनी जाहिर आगामी महोत्सवातील विविध उपक्रम जाहीर
केले.
पाच हजार वृक्षारोपन, आठरा तास अभ्यास अभियान, आदर्श भीम जयंती पुरस्कार, सम्यक जीवन गौरव पुरस्कार, आंतरराष्र्टीय विचार उत्सव, त्रैभाषिक कवी संमेलन, आंबेडकरी जलसा, परिसंवाद, विचार प्रवर्तक देखावा आणि विविध राज्यस्तरीय स्पर्धांच्या माध्यमातून महोत्सव संपन्न होणार आहे.
बैठकीचे सूत्रसंचालन डाॅ.सुरेश हिवाळे,
भूमिका डाॅ. सुनिल जाधव तर आभार प्रदर्शन प्रा. डाॅ. सुरेश शेळके यांनी केले.
सर्वानुमते ठरलेल्या कार्यकारिणीत
उपाध्यक्ष: मुदस्सीर असरार, डाॅ.सुरेश हिवाळे, काॅ. प्रशांत गोरै, डाॅ.भारत नांदुरे,
संजय आदोडे, सचिव: रवी पुराणिक, त्र्यंबक वडसकर, डॉ. ग्यानदेव उपाडे,
संघटक: अमित मोगल, डाॅ.राम खरबे, नितीन गोगलगावकर, राजकुमार एंगडे, उपक्रम प्रमुख: भूषण मोरे, दिलीप बनकर, राहुल धबाले, संघपाल आढागळे,
संयोजक :
प्रेमानंद बनसोडे, प्राचार्य विठ्ठल घुले, एन.आय. काळे, प्रा.डाॅ.सुरेश शेळके, दिगांबर जाधव, परमेश्वर जवादे,
युवा समन्वयक : विश्वजित वाघमारे, अर्जुन पंडीत, साकेत परसोडे, किशोर कांबळे,अनिकेत साळवे,आर्यन बनसोडे,
मुख्य निमंत्रक पदी यशवंत मकरंद, संजीव आढागळे, सुनिल ढवळे, रवी पंडीत, प्रा.डाॅ.भास्कर गायकवाड, उत्तमराव गायकवाड, काॅ.प्रेम धोंगडे, ज्ञानोबा खरात, कमळाजी कावळे,भारत खाडे यांची निवड करण्यात आली.
या बैठकीस परभणी जिल्ह्यातील सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.