परभणी (प्रतिनिधी) दि ३१येथील शिक्षण विभागाचे वरिष्ठ लेखापरीक्षक दत्तात्रय राऊत यांना देशपातळीवर झालेल्या एकांकिका स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले आहे.संपूर्ण भारतातून त्यांना अभिनयाचे सुवर्णपदक प्राप्त झाले आहे.
अखिल भारतीय नागरी सेवा सांस्कृतिक स्पर्धा नुकत्याच दिल्ली येथे पार पडला.यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या संघामध्ये दत्तात्रय राऊत यांची निवड झाली होती.’ निर्णय ‘या एकांकिकेत राऊत यांनी कुटुंबप्रमुख म्हणून सासऱ्याची भूमिका पार पाडली होती.या स्पर्धेत ‘ निर्णय ‘ ही एकांकिका संपूर्ण भारतातून प्रथम येऊन सुवर्णपदक प्राप्त झाले आहे.या स्पर्धेत देशभरातून एकूण २२ राज्याच्या एकांकिका सादर झाल्या होत्या.यामध्ये महाराष्ट्र संघ प्रथम आला आणि त्यात वरिष्ठ लेखाधिकारी दत्तात्रय राऊत यांना अभिनयाचे सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे.शासकीय कामाचा व्याप सांभाळून राऊत यांनी अभिनयाची आवड जोपासली व स्पर्धेत भारतातून प्रथम येण्याचा मान मिळाला ही परभणी जिल्ह्यासाठी सन्मानाची बाब आहे.त्यांच्या या यशाबद्दल शिक्षणाधिकारी डॉ सविता बिरगे,वेतन अधीक्षक संतोष कंठाळे,कनिष्ठ लेखापरिक्षक राजेंद्र थोटे आदींसह जिल्ह्यातील अनेक मुख्याध्यापक,शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.