आपला जिल्हा
सेलूत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

सेलू ( प्रतिनिधी ) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक स्वागताध्यक्ष तथा नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार ( दि. २३ ) रोजी शहरातील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. या नियोजन बैठकीस परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी भेट देऊन सुसंवाद साधला. या प्रसंगी सेलूचे पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांची उपस्थिती होती. बैठकीत पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आणि जयंती समितीचे अध्यक्ष सुबोध काकडे यांचा सत्कार केला. बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्याचे ठरले.




