सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या नूतन विद्यालयाचे “कै.रा.बा.गिल्डा सभागृहाचे” नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे. सेलू शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या या संभागृहाची पाहणी करतांना सेलूचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक वाघमारे,सेलू नगरीचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत,संस्थेचे अध्यक्ष डॉ एस एम लोया,संस्थेचे सहसचिव जयप्रकाश बिहाणी, संचालक नंदकिशोर बाहेती, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, मुख्याध्यापक एस व्ही पाटील, पत्रकार डॉ विलास मोरे, बबलू मंडलिक यांनी भेट देऊन पाहणी केली.