आपला जिल्हा

उपविभाग अधिकारि यांची प्राचीन ऐतिहासिक भगवान नागनाथ मंदिरात सपत्नीक पूजा.

शिवरात्री निमित्त अनेक ठिकाणी फराळाची उत्तम सोय करण्यात आली होती.

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू तालुक्यातील शिवालयात महाशिवरात्रीनिमित्त रविवारी (ता. १५) शिवभक्तांनी मोठी गर्दी केली. या वेळी सेलू उपविभाग अधिकारी शैलेश लाहोटी यांनी हतनूर येथील प्राचीन ऐतिहासिक भगवान नागनाथ मंदिरात सपत्नीक पूजार्चा केली.

अनेक ठिकाणी फराळाची उत्तम सोय करण्यात आली होती.

सेलू शहरातील श्री शंकरलिंग मंदिरात शिवरात्री महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम सुरु होते. मंदिरावर विद्युत रोषणाई, परिसरात स्वच्छता व शिवभक्तांना पिण्याचे पाणी, प्रसादाची सोय करण्यात आली. मंदिर संस्थानचे अध्यक्ष अशोक आप्पा वाडकर, सचिव प्रा. मिलिंद झमकडे, विश्वनाथ हुगे, पवन मिटकरी शुभम नवघरे, अॅड. शाम राऊत, जगन्नाथाप्पा चाकोते, बबनआप्पा झमकडे, रामदाबसवेश्वर गरुड, प्रकाश साखरे, गणेश केशरखाने आदींनी परिश्रम घेतले. वालूर

सेलू : तालुक्यातील वालूर येथील वाल्मिकेश्वर मंदिराचा गाभारा.

येथील वाल्मिकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. येथील माणकेश्वर, सिद्धेश्वर, नगरेश्वर मंदिरात रुद्राभिषेक व दर्शनासाठी दिवसभर रांगा लागल्या होत्या. हातनूर गावातील भगवान नागनाथ मंदिरात पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शन घेतले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!