आपला जिल्हा

टंग टाय (जिव्हा दोष) शस्त्रक्रिया शिबीर उत्साहात संपन्न

सेलू (प्रतिनिधी) :सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व शिक्षण विभाग, सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने टंग टाय (जिव्हा दोष) शस्त्रक्रिया शिबीर यशस्वीपणे पार पडले. सकाळी ९ वाजल्यापासून सुरू झालेल्या या शिबिरास पालकांचा व लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शिबिरामध्ये जिव्हा दोषामुळे बोलण्यात अडचणी, अन्न गिळण्यातील त्रास तसेच इतर आरोग्यविषयक समस्या असलेल्या बालकांची तपासणी करून आवश्यक रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सर्व शस्त्रक्रिया सुरक्षितपणे पार पडल्या असून रुग्णांची योग्य ती काळजी घेण्यात आली.

गटविकास अधिकारी श्री. उदय जाधव, बाल विकास अधिकारी श्री. भाऊसाहेब खरात व गटशिक्षणाधिकारी श्री. गजानन वाघमारे यांच्या समन्वयातून हे शिबीर यशस्वीरीत्या पार पडले. शिबिरात डॉ. संजय हरबडे, डॉ. तेजस तांबोळी, डॉ. गणेश मुळे, डॉ. आलेश, डॉ. आरती, डॉ. सोनाली यांच्यासह सचिन गायकवाड, भाग्यश्री त्रिभुवन, शानेट शाजी, रविता चव्हाण यांच्या वैद्यकीय पथकाने मोलाचे कार्य केले.

तसेच जनार्धन कदम, सुरेश सोळंके, विलास राठोड, माधव गायकवाड, अश्विनी आमले, चंद्रकांत सोळंके व विजय सोंजे यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील बालकांना दर्जेदार आरोग्यसेवा मोफत मिळत असून पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. भविष्यातही अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!