सेलू ( प्रतिनिधी) येथील शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्या वतीने माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने बुधवार ( दि. १५ ) रोजी स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वाचन कक्षात अक्षर व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प प्रसिद्ध वक्ते प्रा. दिलीप चव्हाण ( संचालक, भाषा वाङमय व संस्कृती अभ्यास संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड ) हे ‘ वाचन संस्कृती- आज आणि उद्या ‘ या विषयावर गुंफणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सर्जेराव लहाने ( संस्थापक अध्यक्ष शब्दसह्याद्री प्रतिष्ठान, सेलू ) हे असतील. अक्षर व्याख्यानमालेच्या यशस्वितेसाठी संयोजक डॉ. सुरेश हिवाळे, डॉ. शरद ठाकर, डॉ. सतीश मगर, डॉ. अशोक पाठक, मुख्याध्यापक रमेश नखाते, एकनाथ जाधव, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, रामराव गायकवाड, रामराव बोबडे, सुभाष मोहकरे, माधव गव्हाणे, संध्या फुलपगार परिश्रम घेत आहेत.