आपला जिल्हा

दिव्यांगाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू :- पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर

दिव्यांग संघटनेच्या वतीने 51हजारांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पालकमंत्र्यांकडे सुपूर्द

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू-परभणी जिल्ह्यासह राज्यभरातील दिव्यांगांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू प्रसंगी विधिमंडळात प्रश्न मांडू व दिव्यांग बांधवांना सन्मानाने जगण्यासाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली.

येथील संघर्ष दिव्यांग संघटना तालुका शाखा सेलू यांच्यावतीने जिप चे माजी अर्थ व बांधकाम सभापती अशोक नाना काकडे यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून पालकमंत्री बोलत होत्या .
यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी तुकाराम मगर, उद्योजक महेशराव खारकर,रामेश्वरजी राठी, प्रा. डॉ. राजाराम झोडगे, मनीष कदम ,नरेंद्र दिशागत ॲड.अशोक फोपसे, माजी सभापती बंडू नाना मुळे ,अरुणआप्पा घुंबरे, माजी सभापती नाना कोल्हे , गायकवाड, गोपाळ सेठ काबरा , तालुकाध्यक्ष गणेश काटकर, शहराध्यक्ष अशोक शेलार , दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष साळवे, उपाध्यक्ष अबरार पठाण , सचिव शेख अबरार संध्याताई चिटणीस, ज्योतीताई मोगल , आदी मान्य वर उपस्थित होते.


या वेळी अशोक काकडे यांनी नगर परिषद च्या माध्यमातून शासनाचा दिव्यांगासाठी उपलब्ध असलेला 5% निधी व विविध योजनांचा लाभ दिव्यांग बांधवांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. कै आण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने सर्व दिव्यांग बांधवांना मोफत उबदार ब्लॅकेट वाटप करण्यात आले.
सेलू तालुका संघर्ष दिव्यांग संघटनेच्या वतीने अतिवृष्ठी बाधीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी ला 51 हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.
प्रास्तावीक अशोक उफाडे सुत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!