मानवत ( प्रतिनिधी) तालुक्यातील कोल्हा येथील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने तासिका तत्त्वावरील प्राध्यापक ते परभणी येथील नामांकीत कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून प्रा.डॉ. रामचंद्र मुंजाजी भिसे यांची झालेली निवड हा प्रवास शैक्षणिक क्षेत्र आणि समाजातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील स्वातंत्र्य सेनानी दिगंबर बिंदू वरिष्ठ महाविद्यालयात 2005 साली प्राध्यापक म्हणून सेवेत असेलेल्या डॉ रामचंद्र मुंजाजी भिसे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्रशाला कोल्हा व नेताजी सुभाष विद्यालय मानवत, सेलूच्या नूतन महाविद्यालयात उच्च मा. तर मानवत येथील के.के.एम. महाविद्यालयात पदवी तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात समाजशास्त्र विभागात पदयुत्तर शिक्षण पूर्ण केले, तेथे त्यांनी “सुवर्ण पदक” व प्रथम क्रमांक मिळवला, प्रा.बा.ह. कल्याणकर यांच्या मार्गदर्शना खाली एम.फील. व डॉ विजय सुर्यवंशी याच्या मार्गदर्शनात स्वा.रा.ती.म. नांदेड विद्यापीठातून पी.एचडी. प्राप्त करून युजीसी ची NET राष्ट्रीय पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले. वरिष्ठ महाविद्यालयात अध्यापन कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक व्यावसायीक पात्रता पूर्ण केल्या नंतर स्व.नितिन महाविद्यालय पाथरी, शासकीय ज्ञानविज्ञान महा.वि. छ.संभाजीनगर, ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी येथे घड्याळी तासिका तत्त्वावर ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरु केले. त्यानंतर माजी मत्री डॉ माधवराव किन्हाळकर यांच्या भोकर येथील दिगबरराव बिंदू वरिष्ठ महाविद्यालयात 2005 पासून पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून त्यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून न पाहाता शिक्षण क्षेत्रात स्वतःला झोकून दिले. महाविद्यालयांच्या “वेदन” वार्षिकांकास स्वादातिमची आठ पारितोषीके मिळवून दिली, युजीसीचे बुद्ध अध्ययन केंद्र, 10 वेळा राष्ट्रीय परिषदा व 2 वेळा थायलंड येथे आंतरराष्ट्रीय पारिषदेत सहभाग, महिला सक्षमीकरण, ग्रामीण मातंग समाजातील स्त्री जिवन, राजर्षि शाहू महाराजां वर स्वतःची तीन पुस्तके, विविध जर्नल मधून 40 शोध निबंध, विद्यापीठाच्या संदर्भ ग्रंथात लेखण , राष्ट्रीय सेवायोजनेचे सात वर्षे कार्यक्रमाधिकारी , पाच वर्षे उपप्राचार्य , स्वारातीम चे सिनेट सदस्य, समाजशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य, एम. फिल. व पी . एचडी.चे मार्गदर्शक अशा विविध पदावर सक्षम पणे काम करत असताना परभणी येथील नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्थेच्या कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात संस्थाध्यक्ष श्री हेमंतराव जामकर व उपाध्यक्ष किरणराव सुभेदार, सचिव हेमंतराव जामकर, डॉ अभय सुभेदार ॲड बाळासाहेब जामकर व सर्व संस्था संचालक मंडळाने डॉ रामचंद्र भिसे यांची प्राचार्य पदी निवड करून शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्राचार्य डॉ रामचंद्र भिसे यांचा हा प्रवास शिक्षण क्षेत्र व समाजासाठी प्रेरणादायी आहे.