आपला जिल्हा

लायन्स क्लब सेलूच्या वतीने वृक्षारोपन

सेलू (प्रतिनिधी ) येथील लायन्स क्लबच्या वतीने मंठा रोडवरील खाणीचा मारोती मंदिर व हॉटेल परिवार परिसरात नारळ, फणस, सुपारी, कर्दळी, ग्रीनमेरी अशा विविध प्रकारच्या 40 वृक्षांचे वृक्षारोपन करण्यात आले.

या प्रसंगी सेलू लायन्स क्लब चे अध्यक्ष सुयश पटवारी, सचिव डॉ बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष अजित सराफ, कोषाध्यक्ष डॉ शैलेश मालाणी, गोल्डन मेंबर डॉ कैलास आवटे, दत्तात्रय सोळंके , राजेंद्र सराफ , डॉ . उमेश गायकवाड, डॉ. आशिष मेहता ,हभप प्रसाद महाराज काष्टे अनुप गुप्ता, खुशाल तांगडे, डॉ कुंदन राऊत, डॉ अनुराग जोगदंड, सागर लोया,वानखेडे, कृष्णा काटे, विनोद शेरे, बाळकृष्ण पौळ,ज्ञानेश्वर मगर, राजेंद्र सोनवणे, देवधर, सोळंके आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद महाराज काष्टे, सूत्रसंचालन सुभाष मोहकरे तर सुयश पटवारी यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!