ताज्या घडामोडी

पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे सह नरेंद्र पाडळकर यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव

पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे सह नरेंद्र पाडळकर  यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव

हिंगोली ( प्रतिनिधी ) हिंगोली विधानसभा मध्ये रात्र दिवस काम करणारे व कायदा आणि सुव्यवस्था  राखण्यासाठी पोलीस  अधीक्षक  श्रीकृष्ण  कोकाटे यांनी रात्रंदिवस पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता दरम्यान हिंगोली शहर चे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांच्यासह पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते  प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

जिल्हाधिकारी बोलताना म्हणाले की पोलीस अधीक्षक कोकाटे व हिंगोली शहर चे पोलीस निरीक्षक नरेंद्र यांच्या पथकाने  बंदोबस्त ठेवून कुठलेही अनुचित प्रकार घडला नाही दरम्यान हा पोलीस बंदोबस्त विधानसभा निवडणूक साठी   एक चांगला उपक्रम असल्यामुळे त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी  यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला 

यावेळी जिल्हा परिषद च्या मुख्याधिकारी नेहा भोसले   उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे तहसीलदार श्रीकांत भुजबळ   सहायक पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे सह अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!