आपला जिल्हा

परभणी जिल्ह्यातील शाळा आंतरराष्ट्रीय करण्याचा संकल्प! ध्रुव साकोरे

-नूतन विद्यालय, सेलू येथे सदिच्छा भेट व विकास कामांची पाहणी

सेलू ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदी नियुक्त झालेल्या आ. मेघना दीपक साकोरे यांचे चिरंजीव ध्रुव साकोरे यांनी नूतन विद्यालय, सेलू येथे सदिच्छा भेट दिली. त्यांनी दीपस्तंभ प्रतिष्ठानतर्फे उभारण्यात आलेल्या अद्ययावत संगणक कक्षास भेट देऊन शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली.

 

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष पाटील, उपमुख्याध्यापक श्री. किरण देशपांडे, पर्यवेक्षक श्री. रोहिदास मोगल यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत केले.

ध्रुव साकोरे यांनी संवाद साधताना परभणी जिल्ह्यातील शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याचा संकल्प व्यक्त केला. ते म्हणाले की, शैक्षणिक विकास हे आपले प्रमुख ध्येय असून, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शासन पातळीवर ठोस पावले उचलली जातील, यासाठी आपण प्रयत्नशील राहू असा मनोदय व्यक्त केला..

या भेटीदरम्यान शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भेटीमुळे शाळेच्या प्रगतीला नवा संजीवक मिळाला असल्याची भावना शाळा परिवाराने व्यक्त केली.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!