आपला जिल्हा

बालरंगभूमीच्या वतीने जल्लोष लोककलेचा स्पर्धात्मक महोत्सव

परभणी ( प्रतिनिधी ) 75 हजार रुपयांची पारितोषिके ; चित्रपट अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांची उपस्थिती परभणी : बालरंगभूमी परिषद मुंबई यांच्यावतीने परभणी येथे जल्लोष लोककलेचा हा बालकलावंतांसाठी स्पर्धात्मक महोत्सव होणार आहे. या महोत्सवात तब्बल 75 हजार रुपयांची पारितोषिक असून या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी चित्रपट अभिनेत्री तथा बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती शाखेच्या अध्यक्षा नीलम शिर्के – सामंत यांची उपस्थिती राहणार आहे.
बालरंगभूमी परिषद परभणी शाखेच्या वतीने या लोककला महोत्सवाचे आयोजन 22 सप्टेंबर रविवारी सकाळी 10 वाजता स्थळ वैष्णवी मंगल कार्यालय नांदखेडा रोड परभणी येथे करण्यात आले आहे. वय वर्ष 6 ते 15 या वयोगटातील बालकलावंतांसाठी लोककला या प्रकारातील समूह नृत्य, समूह गायन, एकल गायन, एकल नृत्य व एकल वादन या स्पर्धा होणार आहेत. यासाठी भरघोस पारितोषिके देण्यात येणार आहेत.

महोत्सवात सहभागी होणाऱ्या अव्वल कलाकृतींना प्रोत्साहन पर खालील पुरस्कार देण्यात येतील.
समूह नृत्य आणि समूह गीत पुरस्कार असे असतील.
सर्वोत्कृष्ट:रू.11000/-
सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र
उत्कृष्ट:रू.7000/-
सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
उत्तम:रू.5000/-
सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र
प्रशंसनीय:(२)- रू.२०००/-
सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
एकल कलाकारांना असे पुरस्कार असतील.
एकल गीत/एकल नृत्य/एकल वाद्य
सर्वोत्कृष्ट: रू.3000/-
सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र
उत्कृष्ट: रू.2000/-
सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र
उत्तम: रू.1000/-
सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र
प्रशंसनीय:(2)रू.500/-
सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र.
महोत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व बालकलाकारांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
या महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन बालरंगभूमी परिषद शाखा परभणी चे अध्यक्ष आबा ढोले, उपाध्यक्ष प्रा. नितीन लोहट, कार्याध्यक्ष उपेंद्र दुधगावकर , प्रमुख कार्यवाह त्र्यंबक वडसकर, सहकार्यवाह डॉ. अर्चना चिक्षे , कोषाध्यक्ष संजय पांडे , समन्वयक प्रमोद बल्लाळ, कार्यकारी सदस्य मनीषा उमरीकर, प्रा. किशोर विश्वामित्रे, सचिन आढे, प्रकाश बारबिंड, संदीप राठोड, अनिकेत शेंडे यांच्यासह सर्व बाल रंगभूमी परिषदेच्या सभासदांनी दिली आहे.
या महोत्सवात सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी 18 सप्टेंबर पर्यंत होणे गरजेचे आहे. त्यानंतर आलेल्या संघाचा व स्पर्धकांचा विचार केला जाणार नाही.
नोंदणी साठी संपर्क
त्र्यंबक वडसकर 9922119995
संजय पांडे +91 91302 73833
प्रकाश बारबिंड +91 98600 79009
राजू वाघ +91 86002 47171
संदीप राठोड +919881807890

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!