आपला जिल्हा

प्रिन्स इंग्लीश सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

सेलू ( प्रतिनिधी ) 07 सप्टेंबर रोजी परभणी येथे महाराष्ट्र अथॅलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या परभणी जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी मैदानी स्पर्धा 2024 मध्ये एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलचे विद्यार्थी मुकेश बेटेकर अंडर 16 भालाफेक मध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक पटकावले, मनीषा धनवे अंडर 18 थाळी फेक मध्ये प्रथम मिळवून सुवर्ण पदक पटकावले आणि मनीष दहिकर अंडर 14 उंच उडी प्रकारात दुसरा क्रमांकमिळवून कास्य पदक पटकवत पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय फेरी साठी पात्र ठरले आहेत.

या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्राचार्य प्रा. कार्तिक रत्नाला, प्रा. प्रगती क्षीरसागर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षक प्रा. शिवाजी बुधवंत यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!