आपला जिल्हा

बोथ येथे खासदार संजय जाधव यांची गावकऱ्यांशी भेट

अधीक्षक अभियंता महावितरण, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसीलदार सेलू यांना तात्काळ मदतिच्या सूचना

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू तालुक्यातील बोथ येथे प्रचंड पावसाने गावातील शेत पिकाचे अतोनात नुकसान झाले, घरांचे, जनावरांचे, रस्त्याचे प्रचंड नुकसान झाले. खासदार संजय जाधव यांनी गावकऱ्यांना भेट देऊन झालेल्या नुकसानीचे सरसकट त्वरित मदत करण्याची मागणी केली. विशेषतः महिला मंडळांनी त्यांच्या समस्यां मांडल्या आजच्या घडीला डिलिव्हरी पेशंट तसेच शाळेचे विद्यार्थी, अत्यावश्यक रुग्ण या सर्व समस्याचे निपटारा करावा अशी मागणी केली. छत्रपती संभाजीनगर येथून एनडीआरएफ जवान पाचारण करून सुटका करण्यात आल्याबद्दल गावकऱ्यांनी शिवसेना उपनेते तथा खासदार संजयजी उर्फ बंडू जाधव साहेब यांचे धन्यवाद मानले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय साडेगावकर, माजी जिल्हा परिषद सभापती गंगाप्रसाद आनेराव साहेब बोरी तालुका प्रमुख डॉ.अरुण चौधरी, उपजिल्हाप्रमुख शेषराव वाघमोडे, शैलेश तोष्णीवाल, मारोतराव बोडखे, पाशाभाई अन्सारी,अशोकराव शिंदे उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!