आपला जिल्हा

पिक विमा काढलेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त खरीप पिकाच्या क्षेत्राची पुर्व सुचना देणे वावत करावयाची कार्यवाही

परभणी ( प्रतिनिधी ) प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2024 शासनाने राबविण्यासाठी दि. 26 जुन 2023 अन्वये मान्यता दिलेली असुन परभणी जिल्हयामध्ये आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीकडुन राबविण्यात येत आहे. त्याअन्वये परभणी जिल्ह्यातील एकुण 7,63,062 शेतक-यांनी पिक विमा भरला आहे. त्याअनुषंगाने ज्या शेतक-यांच्या पिक विमा काढलेल्या खरीप पिकांचे नुकसान झालेले आहे अशा शेतक-यांनी

गुगल प्ले स्टोअर वरुन crop insurance हे अॅप (https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central) डाऊनलोड करुन त्यामध्ये पिक विमा संरक्षण घेतलेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Local Calamity) अंतर्गत व सध्या जिल्ह्यात मुग व उडीद पिकांची काढणी चालु असल्याचे दिसून येत आहे अश्या शेतकऱ्यांनी काढणी पश्चात (Cut and Spread) या बाबी अंतर्गत नुकसानग्रस्त पिकांच्या फोटोसह अपलोड करावी किंवा 14447 टोल फ्री क्रमांक यावर तक्रार नोंद करावी. ज्या शेतक-यांना ऑनलाईन तक्रार नोंदवणे शक्य नाही अशा शेतक-यांनी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीच्या जिल्हा / तालुका कार्यालयात आवश्यक कागदपत्रासह सदरची तक्रार नुकसानीची घटना घडल्यापासुन 72 तासाच्या आत तक्रार देणे आवश्यक आहे. सध्या पिकाचे नुकसान हे अतिवृष्टीमुळे झाले असल्याने Crop Insurance अॅपवर Type of Incidence मध्ये Excess Rainfall a Inudation हेच कारण नमुद करुन नुकसानीची माहिती देणे आवश्यक आहे. शेतक-यांनी नुकसान भरपाईसाठी तक्रार नोंदवतांना योग्य ती खबरदारी घेऊनच नुकसानग्रस्त क्षेत्राची नुकसान सुचना/तक्रार विमा कंपनीकडे नोंदवावी असे आवाहन जिल्हा प्रशासना कडुन व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी परभणी यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!