आपला जिल्हा

डी. डी. सोन्नेकर’ नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे आदर्श शिक्षक! – प्राचार्य डॉ.विनायक कोठेकर

नूतन विद्यालयात सेवानिवृत्तीचा भावविवश सहृदय सोहळा संपन्न

सेलू (प्रतिनिधी): सेवाभावातून कोणतीही संस्था मोठी होत असते. संस्थेचे कर्मचारी हीच संस्थेची ओळख अन् बलस्थाने असतात. श्री. डी. डी. सोन्नेकर यांनी सुरुवातीपासून प्रामाणिक ज्ञानार्जन व विद्यार्थी घडविण्यासाठी स्वतःला झोकून दिले होते. त्यामुळेच विविध खेळात अनेक विद्यार्थी तयार करून तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय खुल्या मैदानी स्पर्धेत सेलू गावाचे तसेच नूतन शाळेचे नाव नेहमी अग्रस्थानी राहिले. त्यांच्या याच कामाची पावती म्हणून त्यांना अनेक क्रीडा पुरस्कार देखील मिळाले आहेत. असे शिक्षक श्री. ‘डी. डी. सोन्नेकर’ नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे आदर्श शिक्षक, कायम सर्वांच्या स्मरणात राहतील असे प्रतिपादन प्राचार्य डॉ विनायक कोठेकर यांनी केले.

येथील नूतन विद्यालय मधील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक, पर्यवेक्षक डी. डी. सोन्नेकर यांचा सेवानिवृत्तीबद्दल सहृद्य निरोप व सत्कार समारंभ शुक्रवारी (दि.३०) नूतन विद्यालयाच्या कै.रा.ब.गिल्डा सभागृहात संपन्न झाला. नूतन विद्यालय शिक्षण संस्था पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते सेवागौरव समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री. डी.के. देशपांडे , प्रमुख पाहुणे संस्था सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव श्री जयप्रकाशजी बिहाणी, शालेय समिती अध्यक्ष श्री सितारामजी मंत्री, संस्था पदाधिकारी नंदकिशोर बाहेती , श्री. दत्तराव पावडे , श्री मकरंद दिग्रसकर , शिवछत्रपती पुरस्कार डॉ .माधव शेजुळ, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, मान्यवर उपस्थित होते.

निरोप समारंभाच्या सत्काराला उत्तर देताना पर्यवेक्षक डी. डी. सोन्नेकर म्हणाले की, आपल्या सर्वांचे सहकार्य मैत्री आणि त्याला नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे पदाधिकारी यांचे आशीर्वाद यातूनच यशस्वी सेवा मी पूर्ण करू शकलो. यापुढेही योगा या खेळासाठी तन, मन, धन अर्पून कार्यरत राहणार असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले अन् नूतन विद्यालय शिक्षण संस्थेसाठी रूपये १ लक्ष रुपयांची देणगी सुद्धा जाहीर केली.
गणेश माळवे यांच्या समन्वयातून पर्यवेक्षक श्री डी.डी.सोन्नेकर यांच्या सेवा गौरव विशेषांकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दैनिक महाराष्ट्र स्पोर्ट्स अंकातून कार्याचा धावता आढावा घेण्यात आला.

या वेळी नूतन संस्थेच्या घटक प्रमुख वतीने प्राचार्य डॉ. यू .सी. राठोड , मुख्याध्यापक संतोष पाटील, के. के. देशपांडे, मुख्याध्यापिका सौ. निशा पाटील, सुखानंद बेंडसुरे, प्रशांत नाईक, प्रा. के.के.कदम, प्रा.नागेश कान्हेकर,तसेच शारदा विद्यालय सेलू, न्यू हायस्कूल सेलू, के.बा .विद्यालय सेलू, परशुराम जन्मोत्सव समिती सेलू, मोरया प्रतिष्ठान सेलू तसेच सेलू शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी पत्रकार, प्रतिष्ठीत नागरिक चंद्रशेखर नावाडे, संजय मगर ,संजय मंडलिक, माजी मुख्याध्यापक लक्ष्मण केदासे , एन. एम. देशपांडे, अनिल कुलकर्णी , सेवानिवृत्त कर्मचारी . के. पी. राठोड, एस एस नावाडे, आप्तस्वकीय नातेवाईक अशा अनेक मंडळींनी देविदास सोन्नेकरांचा सत्कार केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एस. व्ही .पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश हिवाळे तर आभार प्रदर्शन पी.टी.कपाटे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी उप-मुख्याध्यापक श्री. के.के. देशपांडे, गणेश माळवे, शिक्षक प्रतिनिधी डॉ. संतोष मलसटवाड, सौ.सुनिता सांगुळे , डॉ.काशिनाथ पल्लेवाड, क्रीडा विभाग प्रमुख प्रशांत नाईक यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!