आपला जिल्हा

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सेलू शाखेत 68 वा वर्धापन दिन व विमा सप्ताह उद्घाटन समारंभ

सेलू ( प्रतिनिधी ) येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सेलू शाखेत 68 व्या वर्धापन दिन व विमा सप्ताह उद्घाटन समारंभ साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री बापूसाहेब ठौंबरे (शाखा प्रबंधक)होते कार्यक्रमाचे उद्धाटन प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ उत्तम राठोड ( नुतन महाविद्यालय सेलू) यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून श्री भाऊसाहेब खरात (बाल विकास प्रकल्प अधिकारी) पंचायत समिती सेलू होते तसेच विमा सप्ताहच्या निमित्त सेलू शाखेच्या वतीने 02 ते 06 सप्टेंबर विमा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे सेलु येथील कर्मचारी शमशोदिन शेख तर्फे कॉर्पोरेट प्रतिज्ञा देण्यात आली सर्वात वरिष्ठ कर्मचारी शमशोदिन शेख, अजय पुंडलिक यांचा सत्कार प्रमुख अतिथी यांचे हस्ते करण्यात आला सर्वात जुने ग्राहक, मौल्यवान ग्राहक इत्यादींचा सन्मान करण्यात आला या सप्ताहामध्ये विशेष सेवा काऊंटर सुरू केले आहे, याप्रसंगी सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष डिझाईन केलेले एल आय सी बॅज परिधान केले होते. या सप्ताहात निबंध स्पर्धा, वृक्षारोपण, वैद्यकीय/आरोग्य शिबीराचे आयोजन, गुरू दिवस, विकास अधिकारी तसेच त्यांच्या उपस्थितीत सी एल आय ए एजंट यांचा सत्कार व 5 सप्टेंबर शिक्षक दिना निमित्त शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे, कार्यक्रमात बापुसाहेब ठोंबरे, नागेश पुराणिक, किरण गुंडेकर, शमशोदिन शेख,अजय पुंडलिक, भास्कर हिप्परगे, प्राचार्य डॉ उत्तम राठोड, भाऊसाहेब खरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले या वेळी प्रभाकर भांडवले, सुभाष राठोड,शिवाजी अघाव, श्रीपती जगताप, समीर थोरात, जाकेर शेख, कृष्णा बोराडे,अमर पाटील,प्रदिप कानकाटे, भालचंद्र बरडे, मन्मथ देवडे, नामदेव मुंढे,राजकुमार नाईकवाडे, शंकर जिवने, संदिप जाधव, नितीन भिसे,अमिर शेख,देवेंद्र सराफ,मुंजा नखाते,बबन झोल आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!